सन 2002 साली गलाई व्यावसायीकांनी एकत्र येऊन माननीय प्रताप शेठ दादा साळुंखे यांच्याकडे संस्था स्थापने विषयी कल्पना बोलून दाखवली. यावेळी ची परिस्थिती सहकाराची स्थिती अतिशय बिकट होती बऱ्याच संस्था बुडाल्या होत्या काही बुडण्याच्या मार्गावर होत्या. ठेवीदारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत निर्णय घेणे फार जोखमेचे होते. मा. दादांनी व बँकिंग क्षेत्राची परिपूर्ण माहिती असणारे माननीय विठ्ठल साळुंखे यांनी यावरती अभ्यास करून आव्हान पेलण्याचे ठरविले. इतर संस्थांच्या झालेल्या चुका सुधारून कमी दरात व सुरक्षित तारण घेऊन कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय दादांनी घेतला व 26 जून 2002 रोजी संस्थेची स्थापना झाली लगेच 11 जुलै 2002 रोजी संस्थेचे उद्घाटन माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम, माननीय जयंतरावजी पाटील व माननीय हर्षवर्धनजी पाटील या तत्कालीन मंत्र्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्वपक्षीय आजी-माजी आमदार या कार्यक्रमास उपस्थित होते. आणि तो शेवटचा राजकीय कार्यक्रम ठरला.
संस्था सुरू झाल्यानंतर कोणतेही राजकारण न आणता व्यवहाराला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी 500 सभासद एक कोटी 25 लाख जमा झाले. गलाई व्यवसायिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला बेंगलोर,चेन्नई, नेल्लोर,मदुराई, सेलम, कोईमतुर, चेंगना शेरी, कोट्याम, त्रिशूल, कालिकत या भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी सोनेतारण कर्जाला भरमसाठ व्याज आकारले जात होते. संस्थेने सुरुवातीलाच कमी व्याज बाजारात सोने तारण कर्ज पुरवठा केला व सावकारांची मक्तेदारी मोडीत काढली व गरजू लोकांना सक्षम पर्याय उभा केला. यानंतरच्या काळात छोटे व्यापारी,भाजीपाला व्यापारी यांना कर्ज पुरवठा करून पतवान बनवले ते कर्ज पिग्मी द्वारा परतफेड करून घेतले आणि खऱ्या अर्थाने सहकार अवतरला गेला.
संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत होती. आपल्या भागात असणारा यंत्रमाग, भाजीपाला, पोल्ट्री, द्राक्ष व्यावसायिक मंडळी सभासद होत गेली आणि संस्था सर्व क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा करत गेली. संस्थेचे गलाई बांधव असणारे सभासद गलाई व्यवसाय निमित्त सर्व देशात पसरले असले कारणाने संस्थेचे कार्यक्षेत्रात वाढ करण्याची मागणी विविध राज्यातून सभासदांकडून होत गेली या मागणीचा विचार करून संस्थेने 2012 साली मल्टीस्टेट दर्जा मिळविला आणि पश्चिम महाराष्ट्रातील मल्टीस्टेट असणारी पहिली संस्था ठरली. संस्थेने प्रथम पासून आधुनिकतेची कास धरली संस्थेने पहिले चलन व पिग्मी गोळा करणे ही कामे संगणकावर केली गेली कालांतराने सी बी एस बँकिंग होण्याचा मान सुद्धा आपल्या संस्थेला मिळाला. सेवा व सुरक्षा हे तत्त्व संस्थेने सुरुवातीपासून पाळले ग्राहकांचे समाधान ही सेवा संस्थेचे कर्मचारी तळमळीने पार पाडतात. त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहणे साठी संचालक मंडळ विश्वस्त म्हणून काटेकोरपणे व सुरक्षित कर्ज वाटप करते व ते वसुलीसाठी अतोनात प्रयत्न करते म्हणून गेल्या पंधरा वर्षात थकबाकी व एनपीएचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे सर्व करत असताना कर्मचारी सभासद व ठेवीदार यांच्यात समान न्याय देत समतोल राखला जातो. आणि या पद्धतीने धोरणात्मक निर्णय होतात संस्था करत असलेल्या कारभार पूर्णपणे पारदर्शक ठेवला जातो. सभासदांना मुख्य कार्यालयात कामकाजा दिवशी दुपारी चार ते पाच यावेळी पूर्ण माहिती जाणून घेण्याची प्रथा सांभाळत असलेली आपली एकमेव संस्था असेल वार्षिक अहवालात इत्यंभूत माहिती असते शासकीय लेखा परीक्षण व संदर्भातील सर्व कामे वेळेत पूर्ण केली जातात. संस्थेला सातत्याने लेखा परीक्षण 'अ' वर्ग मिळत असतो. या पाठीमागे निश्चित सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक या सर्वांचा संस्थे प्रती असणारा विश्वास कर्मचारी यांची संस्थेबद्दल असणारी आत्मीयता, संचालक मंडळाचे प्रयत्न कारणीभूत आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून संस्थेने तब्बल 17 पुरस्कार मिळाले आहेत. स्वनिधी तरतूद करून आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. संस्थेची वाटचाल नियोजन पूर्वक उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने चालू आहे.शिवप्रताप पतसंस्थेच्या शाखा विस्ताराचा माध्यमातून सेवेचा परीघ विस्तृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. संस्थेने सन 2023 पर्यंत 250 कोटी ठेवी 450 कोटीचा व्यवसाय पूर्ण करण्याचे उद्देश ठेवले आहे. सर्वांना बरोबर घेत यशाची पताका आपल्या सर्वांच्या सहकार्याने फडकवत ठेवणार आहे.
√ प्राधान्याने सोने तारण कर्ज वाटप.
√ मनी ट्रान्स्फरची सुविधा उपलब्ध.
√ संपुर्ण संगणकीकृत व्यवस्थापन.
√ १०० एन. पी. ए. ची तरतुद.
√ सुसज्ज रेकॉर्ड रुम.
√ सातत्याने १२% लाभांश देणारी संस्था.
√ स्वामालकीचे सुसज्ज प्रधान कार्यालय.
√ लाईट बिल भरणा.
√ टेलिफोन बिल भरणा.
√ मोबाईल बिल भरणा.
√ VD.T.H रिचार्ज.
√ राष्ट्रीयकृत बँकांचे भरणा / विथड्रॉल.
√ पॅनकार्ड काढणेची सोय.
√ N.E.F.T./R.T.G.S./I.M.P.S सुविधा.
√ सपुंर्ण भारतात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारी बँक म्हणून नावालौकीक करणे.
√ संस्थेच्या प्रत्येक सभासदाचे हित जोपासणे.
√ जास्तीतजास्त सामाजिक व धार्मिक कार्ये करणे.
√ सर्व बँकींग सुविधा सभासदांना उपलब्ध.
खाते असो वा ठेव किंवा कर्ज योजना असो, तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी निवडा एक परिपूर्ण बँकिंग सेवा!
व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटीची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत;
अधिक जाणून घ्याआज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच शिवप्रताप मल्टीस्टेट पेन्शन ठेव योजना सर्वोत्तम ठरते. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अधिक जाणून घ्याउद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही. व्यावसायिक असो वा नोकरदार, स्वतःला शिस्त लावा बचतीची.आजच पूर्ण करा स्वप्नं उद्याची, रिकारींग ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
अधिक जाणून घ्यातुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने आधार बँकिंगद्वारे पैसे डिपॉझिट किंवा विथड्रॉव करू शकता.
काळ बदलतोय आणि बदलत्या काळासोबत झटपट कॅश फ्री
पेमेंटसाठी RuPay EMV ATM
UPI QR CODE द्वारे ग्राहकांकडून पेमेंट स्वीकारा व मिळवा 5 लाखापर्यंत व्यवसायिक कर्ज
तुमचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी 365 दिवस मोबाईल, इंटरनेट बँकिंग सेवा
15+ शाखा
१+ लाख समाधानी खातेदार
मोबाईल बँकिंग / इंटरनेट बँकिंग