● सर्व बँकींग सुविधा सभासदांना उपलब्ध
● गुंतवणूकदारांना सुरक्षित ठिकाण व कर्जदारांना सोने तारण कर्ज अल्पव्याज दरात उपलब्ध
● सपुंर्ण भारतात सर्वोत्कृष्ठ सेवा देणारी बँक म्हणून नावालौकीक करणे.
एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटी मध्ये! कारण आम्ही आमच्या खातेधारकांना उपलब्ध करून देतो अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि जोडीला व्यवसायात आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून भक्कम पाठबळ! तुम्ही जर एक व्यवसायिक आहात तर आजच आपले चालू खाते उघडा आणि मिळवा NEFT / RTGS / IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आधार बँकिंग, इत्यादी सुविधा एकाच छताखाली आणि कोणत्याही प्रकारचे मूल्य न आकारता मोफत सुविधा. निवडा व्यवसाय वृद्धीचा मार्ग शिवप्रताप मल्टीस्टेट चालू खाते! अधिक माहितीसाठी नजीकच्या शिवप्रताप मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
उच्चतम सेवा व सुरक्षा या ब्रीद वाक्यास अनुसरून आपली रक्कम एका सुरक्षित आणि विश्वासार्ह हाती हवी, तेव्हाच एका सर्वसामान्य माणसाला शांत झोप लागते. शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटी तुमच्या या बचतीचे महत्त्व जाणते, म्हणूनच तुमची बचत आम्ही जबाबदारीने सांभाळतो आणि त्यावर ६.५०% परतावा देखील देतो. इतकंच नाही तर बचत खात्यासोबत चेकबुक, NEFT, RTGS, IMPS मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधादेखील देतो ते पण कोणत्याही प्रकारचे मूल्य न घेता, जेणेकरून गरजेच्या वेळी तुम्हाला तुमची रक्कम त्वरितमिळावी. बचत खात्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शिवप्रताप मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.
कुटुंबातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तर प्रत्येक कुटुंब सुरक्षित, समृद्ध व सुखी राहील आणि म्हणूनच शिवप्रताप मल्टीस्टेट सोसायटी सादर करीत आहेत महिलांसाठी महिला बचत गट खाते योजना ! महिलांच्या सबलीकरण व सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला महिला वर्गाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्यात त्यांना ४० हजार रुपयां पर्यन्त कर्ज वाटप करतो त्याबरोबर त्यांना बचतीची सवय लागावी याचे मार्गदर्शन तसेच व्यवसाय वाढीसाठी व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठीचे मार्गदर्शन केले जाते. एका सक्षम भविष्यासाठी आजच निर्णय घ्या. महिला बचत खाते उघडण्यासाठी नजीकच्या शिवप्रताप मल्टीस्टेट शाखेशी संपर्क साधा.